भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही असं आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारत ॲट 100 शिखरपरिषदेत ते बोलत होते. जागतिक कंपन्या आणि उद्योग भारतात फक्त भारतीय बाजारपेठेसाठी येत नाहीत तर तिथल्या गुणवत्तेसाठीही येतात असं ते म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालत असून त्यांना सक्षम करणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं.
Site Admin | December 5, 2024 7:59 PM | EAM S Jaishankar
भारताला फक्त इतर अर्थव्यवस्थांसाठी ग्राहक बाजारपेठ व्हायचं नाही – मंत्री डॉ. एस जयशंकर
