परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. यात द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. भारत-अमेरिका यांच्यात घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी सुलिवान यांच्या वैयक्तिक योगदानाचं जयशंकर यांनी समाज माध्यमावर पोस्टमध्ये कौतुक केलं आहे. जेक सुलिवान आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
Site Admin | January 6, 2025 12:45 PM