कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना इथं ४ जुलैपासून होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करणार आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही २४ वी बैठक असून या बैठकीत गेल्या दोन दशकातल्या विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींची समीक्षा करण्यात येणार आहे. या बरोबरच सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य आणि प्रांतीय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा होईल. या बैठकीत भारताची बाजू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सिक्योर एससीओ या धोरणानुसार मांडली जाणार असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | July 2, 2024 2:24 PM | Astana | EAM Dr S Jaishankar | SCO Summit
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार
