हिंद महासागर ही जगाची जीवनरेखा असून , या क्षेत्रातील देशांमध्ये परस्पर सहमतीने संपर्क यंत्रणा अधिक पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण असली पाहिजे, अस प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एस जय शंकर यांनी केल . ओमान मधील मस्कत इथ आयोजित आठव्या हिंद महासागर संमेलनात ते काल उद्घाटन सत्रात बोलत होते. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडोर आणि भारत म्यानमा थायलंड त्रिपक्षीय राजमार्ग या दोन्ही योजनांना सामूहिक संपर्क योजना मानण्यात याव अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केल. भारत हिंद महासागरच्या दोन्ही किनाऱ्यावरील देशात तणाव आणि संघर्षाच वातावरण असून या तटीय क्षेत्रात निरीक्षण यंत्रणे द्वारे सामुद्रिक सुरक्षा राखण्यात भारत महत्वाची भूमिका निभावत असल्याच जयशंकर यांनी यावेळी सांगितल. दरम्यान , एस जयशंकर यांनी काल ओमान, ब्रूनेई, इराण आणि भूतान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.
Site Admin | February 17, 2025 9:22 AM | EAM Dr S Jaishankar
हिंद महासागर क्षेत्रातील देशांमध्ये संपर्क यंत्रणा पारदर्शी आणि सहकार्यपूर्ण करण्याची गरज – मंत्री एस जयशंकर
