ई-स्पोर्ट्स हे एक उदयोन्मुख क्षेत्र असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिली. नवी दिल्लीत इथे भरणाऱ्या ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ या परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा त्या बोलत होत्या. भारताकडे या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञान तसंच विशेष क्षमता असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ई-स्पोर्ट्स या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत ई-स्पोर्ट्स क्षेत्रातली धोरणं, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या संधींचा आढावा यावर चर्चा होणार आहे.
Site Admin | April 1, 2025 1:28 PM | E sports | RAKSHA KHADSE
ई-स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह २०२५ चं क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन
