दक्षिण अफ्रिकेतल्या बोट्सवानाचे, सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून ड्यूमा बोको निवडून आले आहेत.तिथल्या मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप आलेली नाही, मात्र डेमोक्रेटिक चेंज पक्षानं संसदेत सर्वाधिक ३४ जागा जिंकल्या असून, विद्यमान सत्ताधआरी बोत्सवाना डेमोक्रेटिक पक्षाला चार जागाच जिंकता आल्या आहेत. मावळते राष्ट्राध्यक्ष मोकग्वेटसी यांनी आपण पराभव स्विकारत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बोटत्सवानात तब्बल सहा दशकांनंतर सत्तापालट झाला आहे.