केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध विधायक उपक्रमांमुळे देशात चांगला, शाश्वत बदल घडून आला असून तो विशेषकरुन युवा पिढीच्या फायद्याचा आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल मुंबईतल्या शैक्षणिक संस्थेत ‘भारताचं सबलीकरण-2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते. तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, शाश्वत विकास, उद्योजकता आणि नवोन्मेष यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विकसित भारत घडवण्यात उच्च शिक्षण संस्था महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | July 13, 2024 9:18 AM | जगदीप धनखड