महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून उद्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर पुढचे काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी या काळात नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसंच पाण्याचा जपून वापर करावा,असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.