डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 10, 2024 1:37 PM | Konkan Railway

printer

अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे विस्कळीत, अनेक गाड्या रद्द

गोव्यातल्या पेडणे इथं अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी शिरल्यानं कोकण रेल्वे मार्गावरच्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसंच, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मडगावहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मांडवी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस आणि सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस या गाड्याही आज रद्द झाल्या आहेत. 

 

काल सुटलेली हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस पनवेल-लोणावळा-पुणे-मिरज-मडगाव या मार्गे वळवण्यात आली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे. 

 

दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे मंडणगड बाणकोट रस्त्यावरच्या तुळशी घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. मंडणगड ते अंबडवे दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कापण्याचं काम सुरू आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा