वाहन उद्योगाशी संबंधित २१ वे ऑटोमेकॅनिका दुबई हे प्रदर्शन दुबई जागतिक व्यापार केंद्रात सुरु झालं असून भारतीय वाहन उद्योगाचा त्यात वाढता सहभाग आहे. १७ दालनं,२ हजार २०० हुन अधिक सहभागी यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचं प्रदर्शन १८ टक्क्यांनी मोठं ठरलं आहे. गेल्या वर्षी १६१ देशातल्या तब्बल ५३ हजार वाहनप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. वाहन तंत्रज्ञान आणि वाहनाचे सुटे भाग यामध्ये भारतानं केलेली प्रगती या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. भारतीय अभियांत्रिकी वस्तूंची संयुक्त अरब अमिरातीमधली निर्यात एप्रिल ते ऑक्टोबर २ हजार २४ या कालावधीत ४९ टक्के इतकी वाढली आहे.
Site Admin | December 11, 2024 7:21 PM | Dubai automechanika 2024