अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त पथकानं मध्य प्रदेशात भोपाळ इथून अठराशे कोटीं रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. भोपाळजवळच्या बागरोडा गावातल्या एका कारखान्यातून हे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे