गेल्या वर्षभरात भारतीय तटरक्षक दलानं विविध कारवायांअंतर्गत एकंदर ३७ हजार २१७ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक जप्ती असल्याची माहिती तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर भीष्म सिंह यांनी दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.