देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजाचे योगदान महत्त्वाचे असून भगवान बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला संघर्ष येणाऱ्या काळात प्रेरणादायी असेल असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
जनजातीया गौरव दिवसांनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज देशवासीयांना संदेश दिला. देशाच्या परंपरेत आदिवासी समुहाचे योगदान महत्वाचे असून सध्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचंही त्या म्हणाल्या. देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे आणि त्यातही महिलांचे योगदानही महत्त्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. आदिवासी समाज विकसित झाल्यास देशाचा विकास होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.