मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या ड्युटी फ्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केली आहे. तस्करीचं सोनं विमानतळाबाहेर पोहोचवण्याचं काम ते करत असत. त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ८४ लाख रुपये किमतीची ६ किलो सोन्याची भुकटीही जप्त करण्यात आली.
Site Admin | January 4, 2025 3:53 PM | DRI Mumbai
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार जणांना अटक
