संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलानं ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून पहिल्याच नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेतली. या चाचण्यांमधून भारतीय नौदलाच्या सीकिंग हेलिकॉप्टरमधून जहाजावर क्षेपणास्त्र टाकण्याची क्षमता सिद्ध झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी DRDO, भारतीय नौदल आणि उद्योगांचं अभिनंदन केलं. या चाचण्यांमुळं क्षेपणास्त्राचे मॅन-इन-लूप वैशिष्ट्य सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | February 27, 2025 1:34 PM | DRDO | Indian Navy
नौदलाच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
