संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं एक हजार सेकंदांपेक्षा जास्त काळ सक्रिय कूल्ड स्क्रॅमजेट ग्राऊंड टेस्टिंग करून स्क्रॅमजेट इंजिन विकासकामामध्ये महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीआरडीओच्या हैदराबाद इथं असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेनं काल नव्याने बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट टेस्ट फॅसिलिटीमध्ये जमिनीवर चाचणी घेतली.
जानेवारीत 120 सेकंदांची चाचणी घेण्यात आली होती, त्याप्रमाणेच ही चाचणी करण्यात आली आहे. या यशस्वी चाचणीमुळे ही यंत्रणा लवकरच पूर्ण क्षमतेने उड्डाण क्षमतेच्या चाचणीसाठी सज्ज होणार आहे.हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र हा शस्त्रांचा एक वेगळा प्रकार असून तो दीर्घकाळ ध्वनीच्या वेगाच्या पाचपट जास्त प्रवास करू शकतो.