संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या एआयपी प्रणालीच्या एअर इंडिपेंडंट प्रोपल्शन प्लगची उभारणी आणि त्याचं भारतीय पाणबुड्यांचं एकीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉर्पेडोच्या कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी एकत्रीकरणासंबंधीच्या सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या दोन करारांवर काल संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं दोन्ही करार करण्यात आले. त्यामध्ये एआयपी प्लगचं बांधकाम आणि त्याच्या एकत्रीकरणासाठी मुंबईच्या माझगांव शिपबिल्डर्स लिमिटेडशी करण्यात आलेल्या सुमारे १ हजार ९९० कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे. दुसरा अंदाजे ८७७ कोटी रुपयांचा करार फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपबरोबर करण्यात आला.
Site Admin | December 31, 2024 3:27 PM | DRDO_India