डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान २०२४चं उद्या उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात वार्षिक उन्हाळी अमृत उद्यान २०२४चं उद्घाटन करणार आहेत. हे ​​उद्यान १५ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. उद्यानातल्या काही प्रमुख आकर्षणांत बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉनमधील दुर्मिळ आणि विदेशी फुलांचे लँडस्केप, लांबलचक रोझ गार्डन, भव्य वटवृक्ष, ट्री हाऊससह बाल वाटिका आणि परस्परसंवादी साउंड पाईप प्रदर्शन यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी अमृत उद्यानात खेळाडूंना आमंत्रित करण्यात आलं आहे. अभ्यागतांच्या सुविधेसाठी केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनपासून मोफत शटल बस सेवा देखील उपलब्ध असून त्यांना पर्यावरणपूरक सीड पेपर्स स्मृतीचिन्ह दिलं जाणार आहे. शाळा आणि महाविद्यालयातले शिक्षक तसचं विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा