डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वंचित वर्गाप्रती संवेदनशीलता ही देशाची प्रतिष्ठा – राष्ट्रपती

वंचित वर्गाप्रती असलेली संवेदनशीलता ही समाजाची आणि देशाची प्रतिष्ठा ठरवते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रपती भवनात आयोजित पर्पल फेस्ट कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होत्या. करुणा,सर्वसमावेशकता आणि सलोखा ही भारतीय संस्कृतीची मूल्ये असून अपंगत्वाचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम याविषयी जनजागृती करणं आणि अपंग व्यक्तींना समाजात समजून घेणं, स्वीकारणं हा ‘पर्पल फेस्ट’चा उद्देश असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.

 

 

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयांतर्गत अपंग सक्षमीकरण विभागातर्फे दिव्यांगजनांची प्रतिभा दर्शविण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात दिव्यांगजनांचे सांस्कृतिक सादरीकरणही आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अपंगव्यक्तींनी तयार केलेल्या उत्पादनांच्या प्रदर्शनाला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला

सर्वाधिक वाचले

सर्व पहा