पंजाबच्या केंद्रीय विद्यापीठात केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील संस्कृतींचा मिलाफ दिसून येतो आणि इथल्या विद्यार्थी तसंच शिक्षकांमध्ये भारतातल्या विविधतेच प्रतिबिंब उमटलेलं दिसतं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पंजाबातल्या बठिंडा विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात त्या आज बोलत होत्या.
बठिंडा इथून जवळ असलेल्या तलवंडी इथल्या तखत श्री दमदमा साहिब इथे गुरु नानकांनी त्यांच्या संघर्षमय जीवनातला काही काळ घालवला होता, अशा महत्वाच्या स्थानामधील अध्यात्मिक ऊर्जा आणि वीररस इथेही जाणवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
या दीक्षांत समारंभात गुणवान विद्यार्थ्यांना १ हजार ३१ पदव्या तसेच ६३ पी एच डी आणि ४३ सुवर्णपदकांचं वितरण करण्यात आलं.