यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत.त्यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रूपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे.
केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या प्रतिष्ठेच्या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं.