मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यातला शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त झाला आहे, ही भूमी पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावी, यासाठी विद्यापीठानं पाणी या विषयावर अधिक भर देऊन लोकांचं जीवनमान उंचवावं, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
या समारंभात तीन हजार ४२ विद्यार्थ्यांना पदवी, तर ४१ जणांना पीएचडी प्रदान करण्यात आली.