भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रीनवर मुख्य कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी जवळच्या समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. या वेळी पालिकेच्या जनसंपर्क विभागानं डॉ. आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलं आहे.
Site Admin | December 5, 2024 7:20 PM | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | महापरिनिर्वाण दिन | मुंबई महापालिका