डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2024 3:36 PM | Dr. Subhash Chaudhary

printer

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं निधन

नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . सुभाष चौधरी यांचं एका खासगी रुग्णालयात आज निधन झालं. डॉ. चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता.

 

डॉक्टर चौधरी यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांच्या निधनाचं वृत्त दु:खद आहे, शैक्षणिक क्षेत्रात डॉ चौधरी यांचं भरीव योगदान राहिलं आहे, मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत गडकरी यांनी समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा