राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मुख्य सल्लागार म्हणून प्राध्यापिका डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची उद्दिष्टे गाठण्यासाठी धोरणात्मक दिशानिर्देश तसंच संशोधन सुधारणा आणि मूल्यांकन आदी बाबींवर त्या मार्गदर्शन करतील असं आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात सांगितलं आहे. सौम्या स्वामीनाथन यांनी याआधी जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ तसंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या महासंचालक म्हणूनही काम केलं आहे.
Site Admin | July 10, 2024 10:07 AM | Dr. Soumya Swaminathan | National Tuberculosis Elimination Programme