डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ.शरद कळणावत यांचं निधन

यवतमाळ इथले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कामगार आणि शिक्षक संघटना नेते डॉ. शरद कळणावत यांचं आज सकाळी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. शरद कळणावत यांनी नागपूर आणि अमरावती दोन्ही विद्यापीठांमध्ये कार्यकारी मंडळ आणि विद्वतसभा सदस्य, अधिष्ठाता, मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्या. अमरावती विद्यापीठाची पहिली डॉक्टरेट त्यांना मिळाली होती. उच्च शिक्षण क्षेत्रातला राज्य शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला होता. नुटा या प्राध्यापक संघटनेचे आणि महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे ते आधारस्तंभ होते. यवतमाळ जिल्ह्यातील पन्नासहून अधिक कामगार संघटनांच्या ट्रेड युनियन कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील अनेक नामवंत नियतकालिकांमध्ये विविधांगी लेखन केलेल्या डॉ. शरद कळणावत यांची ‘फुटे आसवांना डोळा’, ‘पापण्यांनी अडवावे आकाश’ आणि ‘जनता बेपत्ता आहे’ ही पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. डॉ. कळणावत यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा