महिलांच्या आरोग्य प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा गाजविणारे, संवेदनशील, विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांचं आज पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी गेले काही महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. वाई इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत चांगला डॉक्टर, प्रतिभावान, लेखक, तीव्र सामाजिक जाणीव असलेला विज्ञानवादी, लोकविज्ञानचा कार्यकर्ता गमावल्याची भावना सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.