परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. इतर अनेक मान्यवरांचीही ते भेट घेणार आहेत, तर आयर्लंडच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान डॉक्टर जयशंकर आयर्लंडचे परराष्ट्र मंत्री सायमन हॅरिस आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतील. भारतीय समुदायाच्या सदस्यांनाही ते भेटणार आहेत. भारत आणि आयर्लंडमध्ये लोकशाही मूल्य, सांस्कृतिक संबंध आणि वाढत्या आर्थिक सहभागावर आधारित मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध आहेत.
Site Admin | March 4, 2025 1:13 PM | Minister Dr. S. Jaishankar
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर
