डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक- डॉक्टर एस.जयशंकर

सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती कठीण असून पश्चिम आशियाई प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे,असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉकटर एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं.ते काल दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जी वीस (G20) परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते.

 

मतभेदाचं रूपांतर वाद आणि संघर्षात होऊ नये,तसंच संघर्षामुळे मोठे नुकसान होता कामा नये असंही जयशंकर यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी काल जोहान्सबर्गमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारत-रशिया द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

 

तसंच युक्रेन संघर्षाशी संबंधित घडामोडींवरही चर्चा केली. डॉक्टर एस.जयशंकर यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचीही भेट घेतली आणि दक्षिण आफ्रिकेच्या G20 प्राधान्यक्रमांसाठी भारताच्या पाठिंब्याचं आश्वासनही दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा