हिंद-प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्वाड एक महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद-प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. क्वाड देश आता हिंद-प्रशांत प्रदेशाच्या सीमेपलिकडे जाऊन प्रश्नांची सोडवण्याचं काम करत आहेत, असं क्वाडच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Site Admin | December 31, 2024 3:20 PM | Dr. S Jaishankar