परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर आणि सध्याच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा केली. डॉ. जयशंकर २४ डिसेंबरपासून सहा दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. प्रमुख द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतील. या भेटीदरम्यान ते अमेरिकेतल्या भारताच्या महावाणिज्य दूतांच्या परिषदेचं अध्यक्षपदही भूषवणार आहेत.
Site Admin | December 27, 2024 3:59 PM | Dr. S Jaishankar