ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी होत असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं ई-श्रम पोर्टलच्या बहुभाषिक सुविधेचं उदघाटन करताना बोलत होते. पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे सामाजिक सुरक्षा योजना आणि उपक्रमांच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश सुलभ होईल, असं ते यावेळी म्हणाले. सर्व असंघटित कामगारांनी त्यांच्या कल्याणासाठी, उपजीविकेसाठी आणि कल्याणासाठी तयार केलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
Site Admin | January 7, 2025 7:16 PM | Dr. Mansukh Mandaviya
ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी-डॉ. मनसुख मांडवीय
