प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचे बंगळूरु इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. चेरियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हृदयरोगशास्त्रातील त्यांचं योगदान नेहमीच स्मरणात राहील असं प्रधानमंत्री म्हणाले. बेंगळुरूमध्ये एका लग्न समारंभात ते अचानक बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचे निधन झाले. भारतात पहिली यशस्वी कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट शस्त्रक्रिया त्यांनी केली होती.
Site Admin | January 26, 2025 8:14 PM | Dr K M Cherian
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचं निधन
