प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ बिबेक देबरॉय यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते एकोणसत्तर वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळं कालच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भर्ती केलं होतं. देबरॉय पूर्वी नीती आयोगाचे सदस्य होते तसंच अर्थमंत्रालयाच्या पायाभूत सुविधा आणि वित्तपुरवठा विषयक तज्ञ समितीचे अध्यक्ष होते. २०१५ मधे त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिबेक देबरॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. देबरॉय थोर विचारवंत आणि अभ्यासक होते. तसंच युवकांच्या दृष्टीकोनातून त्यांनी भारतीय संस्कृतीचं आकलन मांडलं होतं, असं प्रधानमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.