भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केलं. समता आणि माणसांच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी वर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येत आहेत.
नागपूरचे भीमराव फुसे यांनी आपल्या आदरभावना व्यक्त केल्या.