भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयानं येत्या १४ आणि १५ एप्रिलला मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन केलं आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली. या टूर सर्कीटमध्ये मुंबईतल्या दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ मधील बि.आय.टी चाळ, वडाळा इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट मधील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा तर नागपूरच्या दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा यात समावेश आहे.
Site Admin | April 12, 2025 5:14 PM | Dr Babasaheb Ambedkar
येत्या १४ आणि १५ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन
