उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातल्या चार धामपैकी एक असलेल्या गंगोत्री धामचे दरवाजे आजपासून बंद करण्यात आले आहेत. अन्नकूट उत्सवानिमित्त आज दुपारी सव्वा बारा वाजता अभिजीत मुहूर्तावर भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे विधीपूर्वक बंद करण्यात आले.
दर वर्षी हिवाळ्यामध्ये गंगोत्री धामचे दरवाजे बंद करण्यात येतात. या वर्षी आतापर्यंत आठ लाखांहून अधिक भाविकांनी गंगोत्री धामला भेट दिली आहे. याशिवाय रुद्रप्रयागमधल्या केदारनाथ धाम आणि उत्तरकाशीतल्या यमुनोत्री धामचे दरवाजेही बंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. उद्या भाऊबीज निमित्त या दोन्ही धामचे दरवाजे बंद राहणार आहेत.