जगातली युद्ध थांबवणं हे आपलं प्रमुख धोरण असेल, असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विजयानंतरच्या पहिल्या भाषणात ट्रम्प यांनी अमेरिकेत स्थलांतरितांना अवैध मार्गानं येता येणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत २७७ इलेक्टोरल मतं मिळवून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. हे जगातलं सर्वात भव्य पुनरागमन असल्याचं त्याच्या पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे डी वान्स यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प शपथ घेतील. पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना अशा दोलायमान समजल्या जाणाऱ्या राज्यांनी ट्रम्प यांच्या बाजूने कौल देत त्यांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. यामुळं दोन्ही देशातली जागतिक आणि धोरणात्मक भागिदारी आणखी मजबूत होईल, असं प्रधानमंत्री म्हणाले.