अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतले तीन माजी नेते, जॉन एफ केनेडी, रॉबर्ट एफ केनेडी आणि मार्टिन लुथर किंग जुनिअर यांच्या हत्येसंदर्भातल्या नोंदी आणि दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, त्यांचे बंधू रॉबर्ट एफ केनेडी आणि मानवाधिकाराविषयी लढा देणारे नेते मार्टिन लुथर किंग जुनिअर यांच्या हत्येनं अमेरिकेच्या राजकीय इतिहासात मोठी खळबळ उडवून दिली होती.
या हत्यांमागची संदिग्धता अद्याप कायम असून अमेरिकेच्या नागरिकांमध्येही सत्य जाणून घेण्याची प्रचंड इच्छा आहे, असं ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर सांगितलं. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत संबंधित दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश ट्रम्प यांनी दिले आहेत.