अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत अमेरिकेच्या एच-वन बी व्हिसा कार्यक्रमाची पाठराखण केली आहे. एचवन बी व्हिसा हा उत्तम उपक्रम असून त्याने अमेरिकेतल्या खास नोकऱ्यांसाठी उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक मिळवून दिले असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. आपल्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी परदेशी व्यक्तींना रोजगारासाठी व्हिसा देण्याच्या धोरणाबाबत कडक टीका केली होती.
एचवन बी व्हिसामुळे अमेरिकन कंपन्यांना उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केलेले परदेशी नागरिक मिळतात ज्य़ातून त्यांची व्यवसायवृद्धी होऊन अमेरिकेत अधिक रोजगार निर्माण होतात असं अर्थतज्ञांचं मत आहे.