रशिया-यूक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलीन्स्की यांची उपस्थिती महत्वाची नसल्याचं प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
युद्धाची सुरुवात रशियाने यूक्रेनवर हल्ला करून झाली हे ट्रम्प यांनी मान्य केलं, मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलीन्स्की यांच्यावर त्यांनी युद्ध थांबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. दरम्यान, युक्रेनमधील अमेरिकेचे राजदूत कीथ केलॉग यांनी झेलेन्स्की यांची,धाडसी नेता अशी प्रशंसा केली आहे.