डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डोमिनिकन रिपब्लिकमध्येक्लबचं छत कोसळून १८४ जणांचा मृत्यू

डोमिनिक रिपब्लिक या देशाच्या राजधानीत, सॅन्टो डोमिंगो इथे एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा १८४ झाला आहे. आपत्कालीन पथकांमार्फत बचावकार्य सुरु आहे आतापर्यंत १४५ जणांना वाचवण्यात आलं आहे. २० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून किमान आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.

 

लोकप्रिय गायक रुबी पेरेझ याच्या गाण्याची मैफल रंगात आली असताना हा प्रकार घडला. मृतांमध्ये रूबीचा देखील समावेश आहे. माजी खेळाडू आणि तिथल्या परगण्याचे राज्यपाल ऑक्टव्हिया डोटेल यांनाही या अपघातात प्राण गमवावे लागले. अनेक राजकारणी, खेळाडू आणि इतर प्रमुख व्यक्ती या संगीत कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा