डोमिनिक रिपब्लिक या देशाच्या राजधानीत ,सॅन्टो डोमिंगो इथे एका नाईट क्लबचं छत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे ११३ लोक ठार झाले तर १५० हुन अधिक जण जखमी झाले. लोकप्रिय गायक रुबी पेरेझ याच्या गाण्याची मैफल रंगात आली असताना हा प्रकार घडला. मृतांमध्ये रूबीचा देखील समावेश आहे. माजी खेळाडू आणि तिथल्या परगण्याचे राज्यपाल ऑक्टव्हिया डोटेल यांनाही या अपघातात प्राण गमवावे लागले. अजूनही शोधकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Site Admin | April 9, 2025 8:17 PM | Dominican Republic
डोमिनिक रिपब्लिकमध्ये नाईट क्लबचं छत कोसळून ११३ जणांचा मृत्यू
