अमेरिकेचे नव-निर्वाचित अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी ब्रिक्स सदस्य देशांनी नवं चलन तयार करु नये किंवा अमेरिकी डॉलरच्या ऐवजी अन्य चलनाचं समर्थन करु नये अशी मागणी केली असून अन्यथा या देशांवर 100 टक्के कर लागू करण्याचा इशारा दिला आहे. हे देश नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत, तसंच अमेरिकी डॉलरच्या जागी अन्य कोणत्याही चलनाला पाठिंबा देणार नाहीत असं वचन या देशांनी दिलं पाहिजे अशी मागणी ट्रंप यांनी समाज माध्यमावरील एका संदेशाद्वारे केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अमेरिकी डॉलरला ब्रिक्स देश पर्याय देण्याची कोणतीही शक्यता नाही आणि असा प्रयत्न कोणत्याही देशानं केला तर त्यांनी अमेरिकेला रामराम ठोकावा असा इशारा ट्रंप यांनी या संदेशात दिला आहे.