फिनलंडमधील हेलसिंकी इथं सुरू असलेल्या एचपीपी खुल्या टेनिसमध्ये भारताच्या दिवीज शरण आणि त्याचा इस्राईली साथीदार डॅनिएल कुकीरमॅन यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांनी काल रात्री झेशियाचा मॅटेज व्होसेल आणि डेन्मार्कचा जोहान्स इंगिलसेन यांचा 7-6, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दिवीज आणि डॅनिएलचा सामना आज रात्री इटलीचा मार्को बोर्टोलोट्टी आणि फिनलंडचा पॅट्रिक निकलास साल्मिनेन याच्याशी होणार आहे.
Site Admin | November 7, 2024 10:23 AM