सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात आज ‘डिस्ट्रिक्ट इन्स्पायर कॅम्प’ला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने घेतलेल्या या ५ दिवसांच्या निवासी शिबीराचं उदघाटन सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते वडाच्या रोपट्याला जलदान करून झालं. मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यक शास्त्रातल्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरात जिल्ह्यातले २०० गुणवंत विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातले आघाडीचे संशोधक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.