स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधीजींच्या चलेजाव च्या नाऱ्याने प्रेरीत होऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर, घनश्यामदास शहा यांच्यावर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. जिल्हा प्रशासनासह, जेष्ठ नागरीक आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील शहीद स्थळावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
Site Admin | September 9, 2024 3:40 PM | child martyrs | Nandurbar
नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून मानवंदना
