महाराष्ट्र विधान मंडळातल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण या पुरस्कारांचं वितरण ३ सप्टेंबर रोजी मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. सन २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी हे पुरस्कार दिले जातील. यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशन देखील करण्यात येईल, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिली. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. या समारंभाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | August 29, 2024 8:16 PM | Maharashtra
३ सप्टेंबरला महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या उत्कृष्ट संसदपटू आणि भाषण पुरस्कारांचं वितरण
