नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भू विज्ञान पुरस्कार २०२३ प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाण काम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव, राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले, तसंच भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.
उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार आयआयटी मुंबईतले डॉ विक्रम विशाल यांना मिळाला आहे.