राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात एकंदर 33 व्यक्ती आणि संस्थांना हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दिव्यांग व्यक्तींचं जीवन अधिक समृद्ध व्हावं या उद्देशाने आखण्यात आलेल्या 16 परिवर्तनात्मक उपक्रमांचाही या कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या पोर्टलसह अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे. समाजात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि इतर अनेक भागधारकांना एकत्र आणून समावेशक समाजाची उभारणी करण्याचा दृष्टीकोन बळकट करणे हा या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य हेतू आहे. दरम्यान राष्ट्रपती आजपासून पांच दिवसांच्या ओडिशाच्या दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
Site Admin | December 3, 2024 8:59 AM | President Draupadi Murmu | राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कार